विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी ; लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल..

पुणे (हवेली) : सासरकडील लोकांनी विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तिच्या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यांवरून तिचा पती तिरुपती विनायक चव्हाण (वय २८), सासू सखुबाई विनायक चव्हाण (वय ४५), सासरे विनायक गंगाराम चव्हाण (वय ५०, तिघे रा. मु.पो. हळद वाढवण, ता. जळकोट, जि. लातुर) यांचे समवेत नंणद पुष्पा इंद्रजित कोकले (वय २९, रा. मांडणी ता. अहमदपुर जि. लातुर) व प्रणिता हनमंत इंगळे (वय २६, रा. मांजरी बु. ता. हवेली जि.पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या परिचारिका असून त्या लोणी काळभोर परिसरातील एका दवाखान्यात काम करतात. तिरुपती चव्हाण यांचेशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक अपत्य आहे. अपत्य झालेनंतर काही दिवसांनी वरिल पांच जनांनी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
त्यानंतर पिडीत विवाहितेस एप्रिल २०१८ ते २६ डिसेंबर २०२४ या कालावधील हळद वाढवण, येलदरा (ता. जळकोट जि. लातुर) व म्हसोबा वस्ती विठ्ठल मंदिरामागे (मांजरी ब्रु. ता. हवेली जि.पुणे) येथे भांडण करून शाररीक व मानसिक त्रास दिला. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सदर महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार तिच्या सासरकडील ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.



