महाराष्ट्रराजकीय

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्वाचा ; सभापती प्रा. राम शिंदे…

राष्ट्रीय विधायक संमेलन - क्षमता वृद्धी कार्यक्रमात,'संसदीय कामकाजातील सर्वोत्तम आयुधे' या परिसंवादाचे आयोजन...

पुणे (हवेली) : महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने लोककल्याणारी राज्याची संकल्पना साकार करण्याच्यादृष्टीने विविध महत्वपूर्ण कायदे मंजूर केले असुन, लोकशाही सदृढ करण्याकरीता लोकसहभाग अत्यंत महत्वूपर्ण आहे. असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन’ – क्षमता वृद्धी कार्यक्रमात ‘संसदीय कामकाजातील सर्वोत्तम आयुधे’ या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी. जोशी, संमेलनाचे संस्थापक-संयोजक राहुल कराड, युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाने संगणीकृत अणि पेपरलेसच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात झाली आहे. राज्यात सुरुवातीला रोजगार गॅरंटी कायदा अंमलात आला व हा कायदा पुढे देशपातळीवर स्विकारला गेला. त्यामुळे महाराष्ट्र विधानपरिषदेला ऐतिहासिक समृध्द परंपरा लाभली आहे. वेगवेगळ्या राज्यातील आमदारांचा संवाद आणि विचारांची देवाण-घेवाण व्हावी, या उद्देशाने एमआयटीने सुरू केलेल्या हा उपक्रम स्त्युत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आलेल्या ‘वन नेशन वन प्लॅटफॉर्म’ या उपक्रमासाठी ‘एमआयटी’ सारख्या शिक्षक संस्थांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागत आहे असेही प्रा. राम शिंदे म्हणाले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??