जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

इंदापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र राखीव, शासनाचा निधी कुठलाही निधी, अनुदान नाही, वन्यजीव प्राण्यांची जनगणनेचा ठोस आकडेवारी उपलब्ध नाही ; वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी..

संपादक सुनिल थोरात

पुणे (ता.इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील जवळपास ६००० हेक्टर जमीन ही वनविभागाच्या अधिपत्याखाली येते. यावर्षी कडक उन्हाळा असल्याने वन्यजीव व वनपरिक्षेत्राचा आढावा घेण्यात आला.

६००० हजार हेक्टरवर वनपरिक्षेत्राचा ताबा असल्याची माहिती मिळत आहे. या इंदापूर तालुक्यातील ६००० हेक्टरवर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी, लिपीक नवनाथ बागल, असुन या वनपरिक्षेत्राला ३ परिमंळ, ९ बीट व ३ वनपाल याची करडी नजर आहे.

इंदापूर, जंक्शन, भिगवण या गावात विभागणी करण्यात आली आहे. या ३ परिमंडळाची ९ बीटाद्वारे विभागणी करण्यात आली आहे. या बीटात इंदापूर, काटी, बिजवडी, शेळगांव, कवटळी, कळस, भिगवण, पळसदेव, कुंभार याप्रमाणे आहे.

इंदापूर बीट मध्ये १६, काटी बीट १६, बिजवडी बीट ७, शेळगांव बीट २, कवटळी बीट ११, कळस ९, भिगवण ८, पळसदेव बीट ५, कुंभार गाव बीट ६ गावांची इंदापूर वनपरिक्षेत्र विभागाची विभागणी करण्यात आली आहे.

इंदापूर वनपरिक्षेत्राला प्रामुख्याने तीन परिमंडळात विभागण्यात आले असून ९ बीटाच्या माध्यमातून ३ वनपाल याना इंदापूर, जंक्शन, भिगवण अशी गावाची अधिपत्याखाली येत असलेल्या वनपरिक्षेत्राला नेमणूका करण्यात आल्या आहेत.

१) इंदापूर १ वनपाल नरुटे /३ वनरक्षक
२) जंक्शन १ वनपाल ज्ञानदेव ढवरे / ३ वनरक्षक
३) भिगवण १ वनपाल विलास निकम/ ३ वनरक्षक
याप्रमाणे सध्या तरी नेमणूका दिसत आहेत. असे म्हणावे लागेल. ‘द पाॅईट न्यूजच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तीनही वनपाल सेल फोन उचलण्यास असमर्थ असल्याचे जाणवले. अधिक संपर्क साधला असता कुठलेही ठोस उत्तर मिळाले नाही, फोन करणार्यांना काय काम आहे? कुठे आहे असे विचारल्यावर, ठिकाण सांगण्यास असमर्थता दाखवली. यावरून इंदापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र कोणाच्या स्वाधीन आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था असल्याने वन्यजीव प्राण्यांची किती? व कशाप्रकारे काळजी घेत असतील ते न सागितले बरे.

इंदापूर तालुक्यातील परीक्षेत्रातील दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला पाणावट्यावर येणाऱ्या ठराविकच ठिकाणी वन्यजीव प्राण्यांची जनगणनेना करण्यात येते. ‘द पाॅईट न्यूजच्या माध्यमातून माहिती घेण्याचा अधिक प्रयत्न केला असता जनगणनेतील ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्याचप्रमाणे इंदापूर परिक्षेत्रात कृत्रिमरीत्या बनवण्यात आलेल्या पाणवठे यांची संख्या किती आहे याची ठोस माहिती कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याने माहिती मिळू शकली नाही. वन्यजीव प्राणांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था, लागणारे वणवे यावर कशाप्रकारे उपाययोजना करण्यात येते याची माहिती मिळू शकली नाही.

इंदापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र वन्यप्राण्यांची कशाप्रकारे उपाययोजना करण्यात येते, वनपरिक्षेत्र, वन्यप्राण्यांची माहिती यावर वनपाल यांचे हाताची घडी तोंडावर बोट अशी अवस्था असल्याचे जाणवते.

इंदापूर वनपरिक्षेत्रामध्ये आढळणा-या वन्यप्राण्यांचा तपशिल खालीलप्रमाणे.

इंदापूर वनपरिक्षेत्रामध्ये साधारणपणे चिंकारा, लांडगा, काळवीट, कोल्हा, सायाळ इत्यादी प्राणी आढळून येतात. परंतु इंदापूर वनपरिक्षेत्रामध्ये चिंकारा या वन्यप्राण्यांचा आढळ सर्वाधिक आहे. साधारणपणे चिंकारा जातीचे वन्यप्राण्यांची संख्या २००० चे वर आहे. त्यांचे पिण्याच्या पाण्याची सोय करणेकामी इंदापूर वनपरिक्षेत्रामध्ये साधारणपणे एकूण १३१ कृत्रिम पाणवठयांची निर्मिती केलेली आहे. तसेच चिंकारा वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती तसेच पाण्याच्या शोधात असताना होणारे अपघाती मृत्यु रोखणेकामी अजून जास्तीस्त जास्त कृत्रिम पाणवठे निर्माण करण्याचा इंदापूर वनपरिक्षेत्राचा प्रयत्न चालू आहे. असे कागदोपत्री दिसत आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी म्हणाले

की शासनाचा कुठलाही निधी उपलब्ध नाही. सध्यातरी सामाजिक संस्था वन्यजीव प्राण्यांची पाण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहेत. निधी उपलब्ध नसल्याने ठोस उपाययोजना करण्यासाठी अडचणी येत आहेत. शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??