महाराष्ट्रसामाजिक

‘दक्षिण कैलास’ म्हणजे महाराष्ट्रातील ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर मंदिर…

सातारा (शिखर शिंगणापूर) : महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूर हे शंकराचे पुरातन मंदीर महाराष्ट्रातील शिव भक्तांचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे.

तसेच येथील टेकडीवर असलेल्या शंभू महादेवाच्या विशाल मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १८० मीटर उंचीवर चढून जावे लागते.

वाटेत ‘खडकेश्वर’ आणि ‘मांगोबा’ मंदिरांचे दर्शन देखील घडते. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापुर गावाबद्दल सांगितले जाते की, याचे निर्माण यादव वंशांचे चक्रवर्ती सिंधनदेव महाराज यांनी केले होते. मंदिराची भिंतीचे बांधकाम दगडाने केलेलं आहे. तसेच मंदिर परिसरात पाच मोठे नंदी आहे. असे सांगतात की, देवगिरीच्या यादव वंशाचेराजा सिंघन येथे येऊन राहिले होते.

                                अंबरनाथ शिवमंदिर

शंभू महादेवाचे हे प्राचीन मंदिर सातारा जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की शिव-पार्वतीचा विवाह चैत्र अष्टमीच्या दिवशी याच ठिकाणी झाला होता. यासाठी येथील गावकरी दरवर्षी शिव-पार्वतीचा विवाह आयोजित करतात. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.

तसेच मंदिरात गर्भगृह, मध्यांतर, सभामंडप आणि नंदी मंडप यांचा समावेश आहे. तसेच हे मंदिर १७ किंवा १८ व्या शतकाच्या आसपास बांधलेले दिसते. येथे शिव-पार्वतीचे स्वयंनिर्मित लिंग आहे. तसेच मंदिर आणि खांबांवर विविध प्रकारच्या शिल्पे बनवण्यात आली आहे. त्यावर पशुपती, विष्णू, कृष्ण, गणेश आणि इतर शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच शिवरात्रीनिमित्त येथे भव्य मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक त्यांच्या कवडिया घेऊन पूर्ण भक्तीने आणि ‘हर-हर महादेव’चा जयघोष करत येतात. तसेच प्राचीन काळापासून हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.

                                 मार्लेश्वर मंदिर संगमेश्वर

मंदिराची पौराणिक आख्यायिका
शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्‍यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर. तसेच स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला ‘दक्षिण कैलास’ असे म्हणतात. तसेच इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहे. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. तसेच या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. तसेच या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. मग ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.

                                   नागेश्वर मंदिर द्वारका

तसेच शंभू महादेव हे मंदिर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. पुणे, सातारा, सांगली, बारामती, फलटण आणि म्हसवड येथून शिंगणापूरला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??