शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये महसूल अधिकारी ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावून थाटात आला अन कारवाई झाली… सविस्तर वाचा.

पुणे (शिरूर) : शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये पुणे येथील एका मंडलधिकाऱ्याची खाजगी गाडी ‘महाराष्ट्र शासन ‘अशी पाटी लावून आली. ही बाब निलेश वाळुंज यांच्या लक्षात येतात त्यांनी तातडीने शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना या गाडीवर कारवाई करण्याबाबत मागणी केली.
कारवाई नंतर नागरिकांचे समाधान…
“सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज” यांनी सजग नागरिकांसह आवाज उठवल्यानंतर वाहतुक पोलीसांकडून संबंधित वाहन मालक यांच्यावर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात येवून त्याच ठिकाणी दंडही पोलिसांनी भरून घेतला.. अशा पाट्या लावून फिरणाऱ्या सरकारी बाबूंच्या गाडीवर शिरूर मधे झालेली ही पहिलीच कारवाई झाल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले असल्याचे सांगत सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
“महाराष्ट्र शासन” असलेली गाडी घेवून थाटात दाखल..
शिरूर तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारतीमधील वाहनतळावर पुणे महसूल खात्यातील एक अधिकारी स्वतःच्या वाहनावर आतील दर्शनी भागात “महाराष्ट्र शासन” अशी पाटी लावून तहसीलदारांच्या शासकीय गाडीजवळ त्यांचे वाहन घेवून थाटात दाखल झाले “महाराष्ट्र शासन” पाटी असल्याने तेथील सुरक्षा रक्षकाने गाडी मागे घ्यायला सांगून बाजूला असलेल्या दुसऱ्या सरकारी वाहनाशेजारी बॅरिगेट बाजूला करून गाडी लावण्यासाठी जागा दिली.
पार्किंगसाठी नागरिकांची वणवण…
देशाचा मालक असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयात स्वतःची वाहने लावयला जागा नसते, मात्र समोरील बाजूस शासकीय वाहनांसाठी बॅरिगेट्स लावून ठेवले जातात जेणेकरून इतर नागरिक वाहन लावू शकणार नाहीत, जागा असूनही नागरिकांची मात्र यामुळे गैरसोय होत असते, परंतु काही अधिकारी/कर्मचारी स्वतःच्या वाहनांना “महाराष्ट्र शासन” पाटी लावून थाटात येतात आणि त्यांना सुरक्षारक्षक शासकीय गाडी समजून तत्काळ बॅरिगेट्स हटवून जागा करून देतात ही बाब चुकीची असून तेथे उपस्थित असलेले “सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज” यांना हे निदर्शनास आल्यानंतर ते नागरिकांसह गाडीजवळ जाऊन ही बाब “शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे” यांना कळवली आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पाठवून याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
कायदेशीर कारवाई, दंड जागेवरच वसुल…
पोलिस निरीक्षक यांनी तत्काळ वाहतूक पोलीस राजेंद्र वाघमोडे यांना घटनास्थळी पाठवले वाघमोडे यांनी वाहन चालक आणि मालक यांना अशी पाटी लावून तुम्हाला वाहन फिरवता येणार नाही असे सांगून लावलेल्या पाटीसह मशिनद्वारे फोटो काढून तत्काळ ऑनलाइन ५००/- रुपये दंड आकारून कायदेशीर कारवाई केली शिवाय हा दंड ही जागेवरच लगेच ऑनलाइन पेमेंट पद्धतीने भरून घेण्यात आला आणी लावलेली पाटीही तत्काळ उतरवण्यास सांगितली. या कारवाईमुळे तिथे उपस्थित नागरिकांनी वाहतूक पोलिस राजेंद्र वाघमोडे यांचे कौतुक केले आहे.,
अशा आहेत कायदेशीर तरतुदी…
शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता कोणत्याही खासगी वाहनावर कोणताही सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याच्या खासगी वाहनावर “महाराष्ट्र शासन, पोलिस, न्यायाधीश, राज्य सरकार, राज्य शासन, केंद्र सरकार, प्रेस किंवा इतर कोणत्याही शासकीय संस्था/विभागाच्या नावाची पाटी/नाव खासगी वाहनावर लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन, पोलिस, इ.. नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे. जर अशा प्रकारची वाहने ज्यावर ‘महाराष्ट्र शासन’ नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टिकर/लोगो चिकटवून अशी वाहने रस्त्यावर फिरताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई होते. मात्र, खासगी वाहनांवर पोलिस, वकील, डॉक्टर, खासदार, आमदार, न्यायाधीश, महाराष्ट्र शासन, राज्य सरकार, राज्य शासन, केंद्र सरकार, केंद्र शासन” अशी स्टिकर लावून राजरोजसपणे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरून/वाहतूक पोलिसांसमोरून धावत असतात.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून सन-२०२४ मधे अद्यादेशाद्वारे अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु एखाद्या नागरिकाने आवाज उठवला तर अशा कारवाया केल्या जातात, अशी परिस्थिती सध्या आहे. बरेच सरकारी अधिकारी/कर्मचारी पोलिस कारवायांपासून वाचण्यासाठी आणि टोलपासून सुटका मिळावी, तसेच वाहनांना गडद काळ्या काचा, लावून फिरवणे यासाठी वाहनांवर पोलिस, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, आदी पाट्या सर्रासपणे लावल्या जातात. अशा वाहनांच्या आडून गैरकृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही परिवहन विभागाने सांगितले होते. त्यामुळे आता पोलिस आणि परिवहन विभागाने सयुक्त मोहीम हाती घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
पोलिस लोगो अथवा पोलिस नावाचा वापर खाजगी वाहनावर करण्यास मनाई.
संपर्क केल्यानंतर पोलिस निरीक्षक शिरूर यांनी त्वरित वाहतूक पोलीस पाठवून कारवाई केली, प्रादेशिक परिवहन विभागाकडून सन-२०२४ मधे अद्यादेशाद्वारे अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार नुसार कोणत्याही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन, पोलिस, केंद्र शासन इ.. नावाच्या पाटी/लोगो खासगी वाहनांवर लावण्यास सक्त मनाई आहे, शिवाय “गृह विभागानेही” याबत स्वतंत्र परिपत्रकाद्वारे पोलिस खात्यासही सूचना निर्गमित करून ” पोलिस वापरत असलेल्या खासगी वाहनांवर पोलिस लोगो अथवा पोलिस नावाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांना एक आणि अश्या बाबूंना एक न्याय..
तसेच विविध विभागातले अनेक अधिकारी तर बिंदास्त कायदा आणि शासन आदेश पायदळी तुडवत स्वतःचे व्हीआयपी कल्चर मिरवण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनांना विना परवाना लाल दिवा लावून फिरतात, मात्र एखाद्या सर्वसामान्याकडून अनावधानाने एखादा वाहतूक नियम मोडला तर मात्र त्याने खूप मोठा गुन्हा केला आणि जणू आभाळच कोसळले आहे, अशी वागणूक दिली जाते, सर्वसामान्यांना एक आणि अश्या बाबूंना एक हे भारतासारख्या लोकशाही देशात जनहिताचे नाही, यापुढे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारीने वरीलप्रमाणे शासन नियमांचा भंग करताना वाहन निदर्शनास आल्यास “वाहतूक पोलीस/परिवहन विभाग” यांनी त्यांच्या स्तरावरील कारवाई करावी आणि शासन आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाई करिता अभिप्राय पाठवण्यात यावा. असे निलेश यशवंत वाळुंज सामाजिक कार्यकर्ते यांनी म्हटले.



