कृषी व्यापारजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

पुणे ग्रामीण दलाकडून १ कोटी वृक्ष लागवड योजना व हरित वारी उपक्रम, अंतर्गत १०००० वृक्षारोपण महत्वपुर्ण पाऊल…

पुणे : मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे संकल्पनेतुन १ कोटी वृक्ष लागवड व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे संकल्पनेवर आधारीत “हरित वारी ” या पर्यावरण संवर्धन उपक्रमात पुणे ग्रामीण पोलीस दलाने सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
या उपक्रमाअंतर्गत पुणे ग्रामीण जिल्हयात विविध पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन १०,००० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पर्यावरणपुरक दृष्टकोनातुन आणि बारीच्या पारंपारीक श्रदघेला पर्यावरण संरक्षणाची जोड देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

यटेऐ

दिनांक १७/०६/२०२५ रोजी या उपक्रमाची सुरूवात संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांचे हस्ते बह्राणपूर, बारामती उपमुख्यालय या ठिकाणी या वृक्षांची लागवड करून या हरित वारी संकल्पणेची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमासाठी पुणे जिल्हा रेंज फॉरेस्ट अधिकारी मोहिते व त्यांचे इतर अधिकारी यांचे सहकार्याने तसेच वडगाव मावळ, बारामती, सासवड आणि पौंड या वनविभागाकडुन पुणे ग्रामीण पोलीस दलाला एकुण १०,००० झाडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, पुणे व बारामती उप मुख्यालय या ठिकाणी प्रत्यकी २०० झाडे देण्यात आलेली आहेत. सदरच्या रोपांची पालन पोषण हे तेथिल पोलीस अधिकारी व अंमलदार हे करणार आहेत.

या उपक्रमाचे उदिष्ट केवळ वृक्ष लागवड नसुन झाडांचे जतन करणे व वृक्ष तोडीमुळे होणाऱ्या पर्यावरणाचा न्हासापासुन बचाव करणे हा आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दल हे जिल्हा परिक्षेत्रीय वनअधिकारी आणि सामाजिक वनीकरणाच्या सहकायनि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातुन समाजात सकारात्मक संदेश देत असुन, हा उपक्रम भावी पिडीसाठी हरित वारसा तयार करण्यात महत्वाची भुमिका बजावणार आहे. असे सांगितले.
मुख्य संपादक सुनिल थोरात
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??