नव्या कायद्यातील २०२३ च्या कलम २८५ नुसार पहिला गुन्हा दाखल ; विटा
नवीन कायद्याची अंमल बजावणी इतर जिल्हात कधी होणार?

सांगली (विटा) : एका आईस्क्रीम विक्रेत्यावर विटा पोलिसांनी नव्या कायद्यातील भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे पहिला गुन्हा दाखल केला आहे. कमलेश लालचंद जाट (वय ३४) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचा नाव त्याने येथील मायणी रस्त्यावर आईस्क्रीमचा हातगाडा लावला होता. याबाबत हवालदार विक्रमसिंह विजयकुमार गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
विट्यात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत आहे. विटा ते मायणी, विटा ते कराड, विटा ते साळशिंगे रस्त्याकडेच्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांमुळे आणि त्या गाड्यांसमोर ग्राहकांनी लावलेल्या दुचाकींमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ही गोष्ट लक्षात घेता नुकतीच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या हातगाडे विक्रेत्यांना नियम पाळा अन्यथा गुन्हे दाखल करू, अशी तंबी दिली होती.
या पार्श्वभूमीवर आता नव्या कायद्यातील भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे पहिला गुन्हा दाखल केला आहे. कमलेश जाट याने त्याचा आईस्क्रीमचा हातगाडा लावून सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा केला. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, सोयी, सभ्यता आणि नैतिकता प्रभावित करणाऱ्या गुन्ह्यांबद्दल भारतीय न्याय संहिता प्रकरण १५ अंतर्गत जो कोणी, कोणतेही कृत्य करून किंवा त्याच्या ताब्यातील अथवा त्याच्या ताब्यातील कोणत्याही मालमत्तेचा सुव्यवस्था न स्वीकारता, कोणत्याही सार्वजनिक मार्गावर किंवा सार्वजनिक जलमार्गावर कोणत्याही व्यक्तीला धोका, अडथळा किंवा दुखापत निर्माण करेल. म्हणून कमलेश जाट विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा कायदा निर्माण होण्यापूर्वी भारतीय दंड संहिता आय पी सी २८३ अंतर्गत असे गुन्हे दाखल व्हायचे. परंतु त्यामध्ये केवळ २०० ते ५०० रुपयांची दंडाची शिक्षा होती. या नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ च्या २८५ कलमानुसार ५००० हजार रुपये पर्यंत दंडाची तरतूद आहे.



