क्राईम न्युज
अंमली पदार्थ विकणाऱा चौधरी पोलीसांच्या जाळ्यात ; हडपसर..

पुणे (हडपसर) : हडपसर मधील सय्यदनगर चिंतामणीनगर येथे अंमली पदार्थ विक्रेता असलेल्या जोधपुरच्या ३० वर्षीय चौधरीला पोलिसांनी पकडले त्याच्याकडून ८३,०००/- रु. चे अफिम बोडयांचा चुरा (पॉपीस्ट्रा) हा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे.
या स्नाद्र्भात पोलिसांनी सांगितले कि,’ पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांवर कायदेशीर कारवाई करणेचे वरिष्ठांनी आदेशीत केले होते. अनुषगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ कडील अधिकारी व अमंलदार युनिट हददीत गस्त करीत असताना दि. ११/०१/२०२५ रोजी पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे व राहुल शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सय्यदनगर हडपसर पुणे येथील चिंतामणीनगर येथे एक इसम अॅक्टीवा गाडीवर अफिमच्या बोंडयाचा चुरा पॉपीस्ट्रा विक्री करणेसाठी घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली.
फेसबुक पेज – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
सदर बातमी युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांना सापळा व छापा कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांनी मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे काळेपडळ पोलीस स्टेशनशी संपर्क करुन संयुक्तरित्या छापा कारवाई करुन इसम नामे सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी वय ३० रा बिग मार्ट शेजारी चिंतामणी नगर हडपसर मुळ रा जोधपुर राजस्थान यास ताब्यात घेवून त्याचेकडून अॅक्टीवा गाडी, रोख रक्कम व ६१५ ग्रॅम प्रॉपीस्टा अंमली पदार्थ असा ८३,०००/ रु कि.चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचेवर काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमाक ३१/२०२५ एन डी पी एस अॅक्ट कलम ८ (क) १५ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप निरी. प्रशांत लटपटे काळे पडळ पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.



