
पुणे (हडपसर) : ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने “ध्येयतरंग’ कार्यक्रमांतर्गत सकाळचे पत्रकार कृष्णकांत कोबल यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कृष्णकांत कोबल हडपसर मधून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातुन व समाजातील तळागाळातील प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे कार्य दैनिक सकाळ या वृत्तपत्रातून करत आहेत. त्यांच्या लेखनातून समाजातील प्रश्नांची अचूक माहिती शासन दरबारी धडकते. त्यांच्या या अचूक लेखनाने तरुण पिढीलाही प्रेरणा मिळते. बातमी मध्ये अचूक मांडणी, बिनधास्त प्रश्नांची सरबत्ती त्यांच्या बातमीची धार आणखीनच कृष्णकांत कोबल यांना उंचीवर नेते त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या’ संस्थापिका अर्चना शेंडगे, यांनी राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन कृष्णकांत कोबल यांना गौरवण्यात आले.
या राज्य पुरस्कार सोहळ्यात कृष्णकांत कोबल यांना सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
त्यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे, राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे, योजना संचालनालयचे संचालक डॉ. महेश पालकर, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुरेखा भंगे, ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे, सचिव सोनाली गाडे, राज्यप्रमुख संदीप पाटील, सारिका शिंदे, उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.




