लोणी काळभोर पोलीसांची गांजा विक्रेत्यावर कारवाई, १९०००/- रुपये किंमतीचा १ किलोग्रॅम गांजा जप्त….

पुणे (हवेली) : (दि.२१) रोजी रात्री २१:०० वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापुर रोडचे कडेला, माळीमळा येथील राजेंद्र भोजनालयाचे समोरील बाजुस असलेल्या, चिंतामणी मार्बल्सच्या पाठीमागे, मोकळ्या जागेमध्ये ३ इमस गांजा विकत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील पोलीसांना खबर्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. त्या ठिकाणी १) शुभम बापु पालखे वय २१ धंदा मजुरी रा. दत्तमंदिर जवळ, १५ नंबर, जुना कॅनल शेजारी, हडपसर, पुणे २) मयुर विलास बोरकर वय २५ धंदा मजुरी रा. सर्वे नंबर ५, वेताळबाबा वसाहत, ग्लायडींग सेंटर जवळ, हडपसर, पुणे ३) अमन महंमद रफिक कोतवाल वय २७ रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी, हडपसर, पुणे असे तीन इसम गांजा विक्री करताना मिळुन आले.
त्यांचेकडुन लोणी काळभोर पोलीसांनी एकुण ९३० ग्रॅम वजनाचा एकुण १९०००/- रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे.
सदरची कागगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवा. ८१६७क्षिरसागर, पो. शि. ढमढेरे, पो. शि. कटके, पो. शि. ८१०८ नानापुरे यांनी केली आहे.
अवैध धंद्यावरील या कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या कारवाई करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.



