Loni kalbhor, पोलीसांची जुगार अड्डयावर कारवाई, २५,१६,०००/- रु चा मुद्देमाल जप्त..

पुणे (हवेली) : (दि.२३) रोजी १९/४५ वा. चे सुमारास बेट वस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे येथे रेकॉर्डवरील सराईत जुगार चालक इसम नाव उमेश ऊर्फ टका निवृत्ती राखपसरे रा. बेटवस्ती, थेऊर फाटा हा बेकायदेशीररित्या मटका / जुगार पैशांवर खेळत असल्याची बातमी पोलीसांना माहिती झाली.
ही बाातमी माहिती होताच त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तसेच लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस स्टाफ यांनी सापळा रचुन छाप्याची कारवाई केली.
या कारवाई दरम्यान आरोपी नाव १) उमेश ऊर्फ टका निवृत्ती राखपसरे वय ५० वर्षे रा. बेटवस्ती, थेउर फाटा ता. हवेली जि. पुणे २) रोहीत कांबळे वय ३२ वर्षे रा. सदर ३) शाम वामन गायकवाड वय ४७ रा. कोलवडी ४) अक्षय राजेंद्र चौधरी वय २६ रा. सोरतापवाडी ५) ऋतीक राजेंद्र जाधव वय २० रा. जाधववस्ती ६) पांडुरंग निवृत्ती राखपसरे वय ३७ वर्षे रा. बेटवस्ती, थेउर फाटा ७) देवराम ज्ञानोबा गायकवाड वय ३६ वर्षे रा. कोलवडी यांना ताब्यात घेण्यात आले. असुन इतर आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
वरील आरोपीकडुन जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम, व दोन वाहने असा एकुण २५,१६,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक बिराजदार, पो उपनि सोनटक्के, पोहवा जोगदंड, पोहवा आहेर, चालक पोहवा गोंगाने, पो शि जोजारे, पोशि ढमढेरे, पोशि धुमाळ, मपोहवा माळी यांनी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, लोणी काळभोर.
अवैध धंद्यावरील या कारवाई मुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना व्यक्त केली आहे.



