बारामती लोकसभा मतदारसंघात Navale Bridge वरील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबांचा घेतला आढावा, भेटून व्यक्त केले दुःख…

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातात धायरी, पुणे येथील स्वाती नवलकर, दत्तात्रय दाभाडे आणि शांता दाभाडे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातग्रस्त कुटुंबीयांवर ओढवलेले हे मोठे संकट पाहता खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नवलकर व दाभाडे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत संपूर्ण सहकार्याची हमी दिली.
त्यांनी प्रशासनाकडून अपघाताची संपूर्ण चौकशी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणीही केली.
नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांत अस्वस्थता वाढली असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खासदार सुळे यांनी मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत कुटुंबीयांना धीर देत सांगितले की, “या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
Editer sunil thorat



