सामाजिक

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करुन घेण्याचे आवाहन…

पुणे : कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्यता विभागाच्यावतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतर्गत कार्यप्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी आता ११ महिने करण्यात आला आहे. तसेच प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

त्यामुळे ज्या उमेदवारांनी १० मार्च २०२५ किंवा त्यापूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणाचीना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव ५ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व याजनेचा नव्याने लाभ घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांची आधार व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे, यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे यापुढे आधार जोडणीनंतर डीबीटीद्वारे आर्थिक लाभ दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधारशी संलग्न करुन घेणे आवश्यक आहे.

आधार व कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे, त्याच बँक खात्याचा क्रमांक योजनेच्या विद्यावेतन स्वीकारण्यासाठी नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराचे स्वतःचे आधार अद्यावत असणे आवश्यक आहे. आधार संलग्न मोबाईल नंबर व बँक खाते याबाबतची पडताळणी उमेदवारांनी स्वतः करायची असून, ही जबाबदारी ही उमेदवाराची असेल,

सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, प्रशिक्षणार्थीनी आधार पडताळणी करणे तसेच, आस्थापना / नियोक्ते यांनी कागदपत्र तपासणीसाठी जिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८२. रास्ता पेठ, पुणे येथे ३० एप्रिल, २०२५ पर्यंत संपर्क साधून आवश्यक तो तपासणी करुन घ्यावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसंच, आस्थापना / नियोक्ते यांनी घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सा. वा. मोहिते, प्र. सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्याेजकता, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??