कॉलेज मधील प्रेमसंबंधाच्या कारणावरुन दोन मुलांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला. ; वालचंदनगर
जिवघेणा हल्ला करणारे आरोपींना वालचंदनगर पोलीसांनी केले ०२ तासात जेरबंद

डॉ. गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : दिनांक ३१/०१/२०२५ रोजी सकाळी ११/३० वा सुमारास भवानीनगर येथील संचित बाळासो घोळवे, सुजल संतोष जाधव व त्यांचे इतर मित्र मौजे भवानीनगर, सणसर येथील भवानी माता मंदीर मध्ये बसलेले असताना इसम नामे अदनान शेख, ओम धुमाळ, पियुष चव्हाण, निखील शिंदे, यश अरवडे यांनी सुजल जाधव व संचित घोळवे यांना लाथा बुक्कयांनी मारहाण करत अदनान शेख व ओम धुमाळ यांनी त्यांच्याकडील लोखंडी कोयत्याने संचित घोळवे, सुजल जाधव यांच्यावर वार करुन ते पळुन गेले आहेत.
अशी माहिती प्राप्त होताच सदर घटनास्थळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर व इतर पोलीस स्टाफ असे घटनास्थळी जावुन पाहणी करुन घटनेची हकीकत जाणुन घेतली असता असे समजले की, ओम धुमाळ याच्या नातेवाईकांमधील मुलगी हिच्या सोबत संचित घोळवे याचे प्रेम संबध असुन त्याच कारणावरुन ओम धुमाळ व संचित घोळवे यांच्यमध्ये काल दिनांक ३०/०१/२०२५ रोजी वाद झाला होता. परंतु तो वाद दोघांनी आपआपसात मिटवुन घेतला होता. त्यानंतर आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी संचित बाळासो घोळवे, सुजल संतोष जाधव व त्यांचे इतर मित्र मौजे भवानीनगर येथील भवानी माता मंदीर मध्ये बसलेले असताना ओम धुमाळ तसेच त्याचे मित्र अदनान शेख, पियुष चव्हाण, यश अरवडे, निखील शिंदे यांनी येवुन संचित घोळवे यास तु माझ्या मामाच्या मुलीसोबत प्रेम संबंध ठेवतो काय आता तुला सोडत नाही असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरवात करुन अदनान शेख व ओम धुमाळ यांनी त्याच्याकडील लोखंडी कोयत्याने संचित घोळवे व सुजल जाधव यांच्यावर वार केले. त्यामध्ये सुजल जाधव याच्या डोक्यामध्ये जबर वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्यावेळी सुजल जाधव हा रक्तभंबाळ अवस्थेमध्ये खाली पडल्याचे पाहुन वरील सर्व मारहाण करणारे मुले ही पळुन गेली. त्यानंतर सदर जखमी मुलास उपचारकामी भोईटे हॉस्पीटल मध्ये अॅडमिट केले असुन त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची माहिती मा. पोलीस अधिक्षक साो, पुणे ग्रामीण तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो, बारामती विभाग व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, बारामती उपविभाग यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शन व सुचने प्रमाणे मारहाण करणारे आरोपी यांचा शोध घेण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे दोन पथके तयार करुन बारामती च्या दिशेने रवाना केले असता सदर मुले ही बारामती वरुन पुणेच्या दिशेने जात असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त होताच त्याचा सिने स्टाईलने पाठलाग करुन त्यांना सुपा पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे जळगांव ता. बारामती या गावात पोलीस स्टाफ व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने शिफातीने पकडुन ताब्यात घेवुन त्यांना
वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणले आहे. सदर मुलांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नावे
१. अदनान महंमद शेख, वय
१९ वर्षे, व्यवसाय
शिक्षण, रा. मौजे सणसर, ता. इंदापुर,
२. पियुष प्रथम चव्हाण, वय
१९ वर्षे, व्यवसाय
शिक्षण, रा. मौजे सणसर, ता. इंदापुर,
३. यशराज गणेश अरवडे, वय १९ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. मौजे सणसर ता. इंदापुर
व दोन विधी संर्घषित बालके अशी सांगितले सदर घटनेच्या अनुषंगाने घटनेमधील प्रत्यक्षदर्शी व जखमी नामे संचित बाळासो घोळवे, रा. भवानीनगर, ता. इंदापुर, जि. पुणे याच्याकडे सविस्तर चौकशी करुन त्याची फिर्याद घेवुन गुन्हा रजि. नंबर ४३/२०२५ बी.एन.एस कलम १०९, ११८(१), ११५(२), १८९(२), १८९(३), १९१(२), १९१ (३), १९० सह शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यापुढे वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शाळा, कॉलेज, महाविदयालय व परिसरात जे कोणी धारदार शस्त्रे बाळगुन दहशत निर्माण करेल अशा इसमांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल
सदरची कामगिरी ही मा. श्री. पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार साो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा.श्री. डॉ. सुर्दशन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, पोलीस हवालदार बापु मोहिते, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, पोलीस हवालदार गणेश काटकर, पोलीस हवालदार अजित थोरात, पोलीस हवालदार नानासाहेब आटोळे, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव यांनी केली आहे.



