
संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : आपल्या कदमवाकवस्ती मधील कवडीमाळवाडी परिसरातील राजु फौजदार चव्हाण हा युवक Advocat पदी उत्तीर्ण झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजू चव्हाण या युवकाने कवडी माळवाडी गोसावी समाजातील नाव मोठे केल्याची भावना गोसावी समाजातून येत आहे.
गोसावी समाजातून राजू या युवकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतीवर मात करत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणी काळभोर कॉलेज येथुन शिक्षण घेऊन उच्च शिक्षण पूर्ण करत एलएलबी शिक्षण पूर्ण करून यश संपादन केले.
परिक्षेत यश संपादन केल्याने गोसावी वस्ती, अंबिका माता मंदिर या ठिकाणी अंबिका नवरत्न मित्र मंडळ कवडी माळवाडी येथे Advocat राजू चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.



