साधना विद्यालयातील विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी…

संपादक सुनिल थोरात
पुणे (हडपसर) : साधना विद्यालय, हडपसर मधील अटल टिंकरिंग लॅबचा विद्यार्थी दक्ष सागर गायकवाड याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरी यश संपादन केले आहे.
इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत आयोजित स्पर्धेतून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून भारताचा कॅम्पस ॲम्बेसेडर म्हणून या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. या स्पर्धेतून विविध देशाचे एकूण ३६ विद्यार्थी निवडले गेले आहेत. तो ‘भारत’ देशाचा प्रतिनिधी म्हणून २१ ते २९ जुलै २०२५ या कालावधीत जकार्ता, इंडोनेशिया या देशात ऑफलाईन कॉन्फरन्स साठी जाणार आहे.
तसेच जागतिक कीर्तीच्या व अमेरिका स्थित मेटा (Meta) कंपनीकडून वरील विद्यार्थ्यांची Exclusive Student Ambassador म्हणून निवड करण्यात आली आहे. ३ वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये त्याने रोबोटिक्स, ए आय तंत्रज्ञान, कोडिंग व कॉम्प्युटर प्रोग्रामिंग च्या मदतीने ऑनलाईन प्रोजेक्ट टास्क पूर्ण केले. मेटा कंपनीकडून त्याला १७ व १८ सप्टेंबर २०२५ या तारखेला अमेरिकेत होणाऱ्या “Meta Collaboration Event 2025” साठी निमंत्रित करण्यात आले आहे.विद्यालयाचे अटल इन चार्ज मुराद तांबोळी यांनी या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय चेअरमन, आमदार चेतन तुपे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे, अरविंद भाऊ तुपे, विभागीय अधिकारी संजय मोहिते, सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे यांनी या विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



