
पुणे (हडपसर) : पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर, जे.एस.पी.एम. जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर पुणे वतीने वारीमध्ये सहभागी वारीकर्यांना औषध आणि पौष्टिक नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
अन्नदान व औषध वितरण महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडले.
यावेळी वारी मार्गावर औषध वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पायी वारी करणाऱ्या भाविकांना थकवा, पावसामुळे होणारे त्रास, पायांच्या सूज व इतर तात्काळ उपचार आवश्यक असलेल्या समस्यांसाठी औषधे विनामूल्य देण्यात आली. तसेच, शारीरिक ऊर्जा टिकवण्यासाठी फळे, राजगिरा लाडू आणि अन्य पौष्टिक नाश्ता देखील देण्यात आला.
या उपक्रमात फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रफुल्ल प्र.आडकर, शिक्षकवर्ग आणि अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी औषध वाटपासोबतच वारीकर्यांना डॉ. स्नेहा आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही दिले. सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. वारीमध्ये सेवा देताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव मिळाल्यामुळे त्यांच्यातील सामाजिक जाणीव आणि व्यावसायिक कौशल्यात वाढ झाली, असे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. जे एस पी एम हडपसर शैक्षणिक संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे व डॉ. काळभांडे सर यांचे उपक्रमाला मार्गदर्शन लाभले व त्यांनी स्वतः उपस्थिती नोंदवली. जे. एस. पी. एम. शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव मा. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी उपक्रमाचे कौतुक केले व टी.एस.एस.एम. सचिव श्री. गिरीराज सावंत यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रा. अनुराधा पाटील यांनी या आरोग्य शिबिराचे नियोजन केले. प्रा. स्वप्निल गाडेकर, प्रा. सागर सोनार, प्रा. निकिता कोलते, प्रा. रविराज जाधव, प्रा. प्रगती लगदिवे,प्रा. अजय साळुंके, विवेक थोरात, वैष्णवी तानवडे, स्वाती माकोने, स्वप्नाली सावंत, प्रियंका महाजन, पवार काका, कल्पना सुरवसे, कोमल चांदणे यांनी सहकार्य केले.
मुख्य संपादक सुनिल थोरात



