जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अजित पवार विजयी झाल्याने त्यांच्या नावाची इतिहासात नोंद…

अजित पवार यांनी इतिहास घडवला! तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा 'साखर'पर्व सुरू...

पुणे (बारामती) : अखेर दादांची दादागिरी फळाला आली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. या विजयाबरोबरच त्यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे.

एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक लढवून त्यात विजय मिळवत अजितदादा तब्बल ४३ वर्षांनंतर संचालक पदावर विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर असताना साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्णयही ऐतिहासिक ठरला.

बारामती तालुक्यातील माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. याची दोन महत्वाची कारणे आहेत. पहले म्हणजे स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर दुसरे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले पॅनेल निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पहिला निकाल अजितदादांच्या पॅनेलच्या बाजूने लागला. खुद्द अजित पवारांनी विजय मिळवत पॅनेलची विजयी घोडदौड सुरू केली. त्यांनी ब वर्ग गटातून विजय मिळवत वैध १०१ पैकी तब्बल ९१ मते मिळवली. हा गट सहकारी संस्थांचा आहे. अजित पवारांचा हा विजय अपेक्षितच होता.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतेक संस्थांवर दादांचेच नेतृत्व आहे. त्यामुळे हा गट सर्वाधिक सुरक्षित गट मानला जातो. या गटात कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी तो सहज निवडणून आला असतो. पण स्वत: अजितदादा निवडणुकीत लढवत असल्याने त्याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.

साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची दादांची ही दुसरी वेळ. पहिली निवडणुकीत त्यांनी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची लढवली होती. खरंतर राजकीय आयुष्यातीलच त्यांची ही पहिली निवडणूक होती. १९८२ मध्ये झालेल्या या निवडणुकीत ते विजयी झाले आणि कारखान्याचे संचालक बनले. त्यानंतर तब्बल ४३ वर्षांनंतर ते एखाद्या कारखान्याचे संचालक बनले आहेत. त्याआधी १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले होते. जवळपास १६ वर्षे ते या पदावर होते.

आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी अजित पवार यांची वाटचाल राहिली आहे. पण त्याची सुरूवात सहकारातून झाली होती. आता पुन्हा ४३ वर्षांनंतर ते साखर कारखान्याच्या संचालक पदावर विराजमान झाले आहेत. ‘अजितदादा म्हणजे पक्का वादा’ असे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आता ते कारखान्याचे संचालक झाल्याने माळेगावच्या प्रत्येक निर्णयाकडे सहकार क्षेत्राचे, प्रामुख्याने राज्यातील इतर साखर कारखान्यांचे लक्ष असणार आहे.

मुख्य संपादक सुनिल थोरात

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??