
पुणे (हवेली) : साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा याची प्रचिती आज कदमवाकवस्ती, लोणी काळभोर मध्ये पालखीच्या शुभ आगमनाने प्रत्येक घरात दिवाळी साजरी करण्यात आली.
तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय कडून श्री. संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करून वसुधैव कुटुंबकम” याची प्रचिती करण्यात आली. वारीत सर्व एक आहोत आणि आपण सर्व एका परमात्म्याचे लेकर आहोत हा संदेश वारीतून दिला असे प्रजापिता ब्रह्माकुमारी यांनी सांगितले.
ब्रह्माकुमारीज लोणी काळभोर सेन्टर कडून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान चे अध्यक्ष मा श्री.ह.भ.प.जालिंदर मोरे महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.दिलिप मोरे विश्वस्त मंडळ तसेच लोणी काळभोर हवेलीच्या तहसीलदार मा. तृप्ती कोलते यांचे लोणी काळभोर सेन्टर संचालिका ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी तसेच ब्रह्माकुमारी स्मिता, गौरी, सरिता, विद्या यासकडून ईश्वरीय भेट तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच अध्यक्ष व इतर विश्वस्ताना वारीसाठी शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
या प्रसंगी ब्रह्माकुमार धनाजी भाई राजू भाई लक्ष्मी माता व इतर ईश्वरीय परिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मुख्य संपादक सुनिल थोरात






