जिल्हासामाजिक

हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी होलिका पूजन! -हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचेकडून शुभेच्छा ; इंदापूर…

डॉ गजानन टिंगरे

पुणे (इंदापूर) :  इंदापूर येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगलो येथे रूढी व परंपरेनुसार धार्मिक वातावरणात होलिका पूजन गुरुवारी (दि.१३) सायंकाळी उत्साहात करण्यात आले.

यावेळी हर्षवर्धन पाटील व जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते होळीचे प्रज्वलन करून आरती करण्यात आली.

होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आरोग्य व शांती नांदो..अशा शुभेच्छा याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केल्या. समाजातील या दुष्प्रवृत्तींचा नाश करून सत्प्रवृत्तीची वृद्धी व्हावी, तसेच होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, आळस, द्वेष, मत्सर, मतभेद यांचे दहन होऊन, सर्वांना निरोगी व उत्तम आरोग्य लाभावे तसेच प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद, सुख आणि शांती तेवत राहावी, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन कालापासून होळी व धुलीवंदन सणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने होळीच्या अग्निमध्ये विचारांची नकारात्मकता जळून जाऊन प्रेम, शांती, आनंद समाजामध्ये निर्माण व्हावा, तसेच जीवन सुंदर आणि रंगीबेरंगी असून, ही होळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अधिक प्रेम आणि आनंदाचे रंग निर्माण करेल, या शब्दात हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी जनतेला होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??