लोकशाही बळकट करण्यासाठी चंद्रकांतदादांचे आवाहन ; स्वतःचे SIR मॅपिंग पूर्ण…

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड येथे स्वतःचे SIR (Special Intensive Revision) मॅपिंग पूर्ण करत नागरिकांना देखील तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवली जात आहे.
यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून SIR मॅपिंग प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे मतदार यादीतील त्यांची माहिती अधिकृतरीत्या अद्ययावत आणि सुरक्षित झाली आहे.
याप्रसंगी बोलताना ना. पाटील म्हणाले, “लोकशाहीत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा सर्वात मोठा अधिकार आहे. मात्र मतदार यादीत नाव अचूक असणे तितकेच आवश्यक आहे. दुबार नावे, चुकीची माहिती आणि भविष्यातील गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपले SIR मॅपिंग तातडीने पूर्ण करावे.”
पुढे ते म्हणाले, “मी स्वतः ही प्रक्रिया पूर्ण केली असून आता सर्व पुणेकर आणि राज्यातील नागरिकांनीही पुढाकार घेत लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे.”
Editer sunil thorat



