आरोग्यजिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा ; रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन…

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागात सोफोश सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी थॅलेसेमिया बालरुग्णांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी बालरुग्णांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, मेट्रन श्रीमती केदारी, समाजसेवा अधीक्षक विभागाचे विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे, संबंधित विभागातील डॉक्टर, परिचारिका, सुमारे ५० थॅलेसेमिया बालरुग्ण, सोफोश संस्थेचे पदाधिकारी तसेच रुग्णांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. यल्लप्पा जाधव आणि मेट्रन श्रीमती केदारी यांनी थॅलेसेमिया रुग्णांसाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढे येण्याचे आवाहन केले. थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठ्याची गरज असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ऐच्छिक रक्तदानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. शंकर मुगावे यांनी थॅलेसेमिया आजार, त्यावरील उपचार आणि ऐच्छिक रक्तदानाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. जनकल्याण समितीमार्फत करण्यात आलेल्या २४ हजार नागरिकांच्या रक्त तपासणी सर्वेक्षणात सुमारे ३ टक्के नागरिकांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान” राबविण्यात येणार असून राज्यभरातील महाविद्यालये, सामाजिक संस्था, सत्संग मंडळे आदी स्तरांवर जनजागृती, प्रचार-प्रसार आणि रक्त तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या अभियानात जनकल्याण समिती आणि भारतीय रक्तविज्ञान शास्त्र संस्था (ISBTI) यांचा प्रमुख सहभाग असणार असल्याचे सांगत, थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांनीही समाजात जनजागृतीचे माध्यम बनावे तसेच तरुणांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन डॉ. मुगावे यांनी केले. “ऐच्छिक रक्तदान ही आजची काळाची गरज आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??