जिल्हाराजकीय

इंदापूर भाजप मध्य मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; समर्पित कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या…

इंदापूर : भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर विधानसभा क्षेत्रातील मध्य मंडळाच्या नव्याने गठित कार्यकारिणीची अधिकृत घोषणा आज भव्य कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे, तसेच भाजपा युवा नेते प्रवीण भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

 

कार्यक्रमात पक्षाच्या नेतृत्वाने स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या समर्पित कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या सोपवून संघटन अधिक बळकट करण्याचा स्पष्ट संदेश दिला. राजकुमार जठार (अध्यक्ष, भाजपा इंदापूर विधानसभा) यांनी सांगितले की, “नवीन कार्यकारिणी ही स्थानिक विकास, जनसंपर्क आणि पक्ष विस्ताराच्या दृष्टीने प्रभावी ठरेल, असा विश्वास आहे.”

विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा जोश, महिलांचा सक्रिय सहभाग आणि अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे ही कार्यकारिणी ऊर्जा, अनुभव आणि समावेशकतेचा उत्तम नमुना ठरणार आहे. लवकरच नव्युक्त पदाधिकाऱ्यांना औपचारिकपणे नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत.

या वेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिनिधी धनंजय काळे

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??