मोबाईलवर बोलताना रेल्वेखाली येऊन तरुणाचा जागीच मृत्यू…
पुणे (हवेली) : रेल्वे रुळावरून मोबाईलवर बोलत चालत असताना मागून आलेल्या रेल्वेने धडक दिल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर रेल्वे उड्डाणपुलाखाली गुरुवार (७ ऑगस्ट) रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली.
मृत तरुणाची ओळख बंटी राजा परमार (वय ३९, रा. पिप्रोदा उबारी, शिवपुरी – मध्यप्रदेश) अशी झाली आहे. बंटी परमार हा लोणी काळभोर परिसरात कामासाठी आला होता आणि मिळकतीतून घरी पैसे पाठवत होता.
गुरुवारी संध्याकाळी मोबाईलवर बोलत पायी रुळावरून जात असताना थेऊर रेल्वे उड्डाणपुलाखाली मागून आलेल्या रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत लोणी काळभोर पोलिसांनी महाराजा रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
लोणी काळभोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यात पाठविला आहे. हा प्रकार अपघात होता की आत्महत्या, याचा तपास पोलीस हवालदार चंद्रकांत माने यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
Editer sunil thorat




