जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

महाराष्ट्रातील सर्वात मोठी मतचोरी? यशोमती ठाकूर यांचा आकडेवारीसह घोटाळ्याचा भांडाफोड…

तिवसा व अमरावतीत लाखोंची मतदार कपात; “35 हजारांहून अधिक मते चोरीला गेली” असा गंभीर आरोप...

पुणे : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव, काहींचा अगदी काठावर विजय, आणि काही ठिकाणी झालेल्या मतदार कपातीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघातून पराभूत झालेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीसह दावा केला आहे की, महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत “सर्वात मोठी मतचोरी” झाली.

तिवसा मतदारसंघातील आकडेवारी…

2009 : 2,43,802 मतदार

2014 : 2,70,408 (5 वर्षांत 26,606 वाढ)

2019 : 2,95,992 (5 वर्षांत 25,584 वाढ)

2024 लोकसभा : अपेक्षित संख्या 3,20,000 असताना, प्रत्यक्ष फक्त 2,84,243 — म्हणजे 11,749 मतांची घट आणि नैसर्गिक वाढ धरून एकूण 36,000 मतांची कपात.

2024 विधानसभा (6 महिने नंतर) : अचानक वाढ — 2,96,495 (6 महिन्यात 12,252 मते वाढली).

ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला की, 5 वर्षांत घटलेले मतदार अचानक 6 महिन्यांत कुठून वाढले? ही कपात व वाढ कोणाच्या हितासाठी झाली?

अमरावती लोकसभा मतदारसंघातील घडामोडी…

2009 : 14,23,855 मतदार

2014 : 16,12,739 (1,88,884 वाढ)

2019 : 18,33,091 (2,20,352 वाढ)

2024 : 18,38,768 — फक्त 5,677 वाढ (म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख मते कपात).

अशा कपातीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसचे बळवंत वानखडे हे 20,000 मतांनी विजयी झाले. ठाकूर यांचा दावा आहे की, कपात झाली नसती तर विजयाचा फरक 1 लाखाहून अधिक मतांचा झाला असता.

यशोमती ठाकूर यांचे आरोप…

तिवसा मतदारसंघातून काँग्रेस विचारसरणीची 25 हजार मते वगळून, भाजप विचारसरणीची मते समाविष्ट केली गेली असावी.

मतदार याद्या मागवल्यानंतर एक्सेल फाईलमधून जवळपास 14 हजार बोगस मते उघडकीस आली.

मतचोरी रोखण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू असून, गडबड झालेल्या मतदारसंघांची स्वतंत्र यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे.

आवश्यक असल्यास हा मुद्दा कोर्टात नेण्याची तयारी असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

               पार्श्वभूमी…

विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला होता, परंतु अवघ्या 6 महिन्यांत विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचा पराभव झाल्याने संशयाची साखळी निर्माण झाली. मतदार यादीतील कपात आणि अनैसर्गिक वाढीच्या आकडेवारीमुळे “मतचोरी” हा मुद्दा आता राज्याच्या राजकारणातील गरम विषय बनला आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??