
गोवा : जुन्या गोव्यातील हेल्थवे हॉस्पिटलमध्ये २४ वर्षीय मोरोक्कन महिला रूग्णावर भयानक आणि धक्कादायक प्रकार घडला. ICU मध्ये उपचार सुरू असताना सोलापूर येथील २८ वर्षीय डॉक्टर वृषभ दोशीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला भारतात बिझनेस व्हिसावर आली होती आणि नंतर दिवार बेटाजवळील एका एनजीओच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात पोहोचली होती. अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिला हेल्थवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
घटनेवेळी आरोपी डॉक्टर दोशीने नर्सला बाहेर पाठवले आणि तपासणीच्या बहाण्याने ICU मध्ये प्रवेश करून पीडितेवर अत्याचार केला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आणि थेट सोलापूरमध्ये पोहोचला, जिथून पोलिसांनी त्याला अटक केली.
हेल्थवे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने आरोपी डॉक्टराला तात्काळ निलंबित केले असून पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडितेवर अद्याप उपचार सुरू आहेत. पोलिसांनी एफआयआर नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे.
या घटनेने गोव्यातील आरोग्य सेवांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला असून, प्रशासनात खळबळ उडाली आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोग्य प्रशासन हाॅस्पिटल यांना काय सुचना करणार व हाॅस्पिटलची तपासणी करून शासन करणार का?सर्वसामान्य जनते बरोबर रुग्णांनांचे आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसाठी लक्ष लागून राहिले आहे. यात शंका नाही.
Editer sunil thorat



