बुलेट राजावर पोलिसांनी केली कडक कारवाई…
कारवाई न करण्यासाठी कोणाचा हस्तक्षेप ? नाव गुलदस्त्यात..

पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलीस ठाणे व वाहतूक शाखा यांच्या संयुक्त कारवाईत अनेक बुलेट सर स्वरांचे सायलेन्सर जप्त केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे त्यामुळे लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बुलेट करणाऱ्यांचा आवाज या कारवाईमुळे थंड झाला आहे.
अनेक बुलेट चालक त्यांच्या गाडीच्या सायलेंसरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात गाड्या चालवतात व फटक्या सारखा आवाज काढतात अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती.
त्या अनुषंगाने कडक कारवाई करण्यात आली. आवाजामुळे नागरिकांना त्रास होत होता. तसेच अनेक बुलेट स्वार शाळा व कॉलेज भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस शाळा व काँलेज जवळ असा आवाज काढत तरुणींना व नागरिकांना त्रास देत होते. पोलिस अशा बुलेट चालकांवर कारवाई करतात का नाही याची नागरिकां मध्ये चर्चा सुरू होती. परंतु या कारवाईमुळे बुलेट राजाचे धाबे दणाणले यात शंका नाही.
पोलिसांनी फटफट आवाज काढणाऱ्यांवर बुलेट पोलीस ठाण्यात आणल्या व त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस व वाहतूक शाखा दुचाकी गाड्यांवर कडक कारवाई केली. यामध्ये एकुण वीस बुलेट वर कारवाई केली. ही कारवाई लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे , वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलिस अंमदार, सोमनाथ गळाकाटे, पोलीस हवालदार महेश चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार, योगेश काकडे, बापु बांगर, विकास ओव्हाळ यांनी कारवाई केली.



