गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या पत्नी हेतल पटेल यांची श्री क्षेत्र थेऊरला भेट ; भारतीय जनता पार्टी हवेली कडून सन्मान…

थेऊर (पुणे) : दि. ४ ऑक्टोबर २०२५ गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या पत्नी हेतल पटेल यांनी पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र थेऊर येथे भेट देऊन श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला. भगवान गणेशाचे दर्शन घेत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या भेटीप्रसंगी हेतल पटेल यांचा भारतीय जनता पार्टी हवेली तालुका मंडळ यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी फुलांचा गुच्छ आणि शाल-श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी हवेली मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, सरचिटणीस कमलेश काळभोर, उपाध्यक्ष नामदेव जवळकर, किसान मोर्चा अध्यक्ष तानाजी आप्पा काळभोर, उद्योग आघाडी अध्यक्ष नबाजी रुपनर, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष सतीश खंडेलवाल, प्रशांत अण्णा काळभोर आणि सोशल मीडिया अध्यक्ष प्रशांत भोंडवे हे मान्यवर उपस्थित होते.
सत्कारानंतर हेतल पटेल यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या आदरातिथ्याचे कौतुक केले आणि गणेश भक्तीचे हे पवित्र स्थळ पाहून समाधान व्यक्त केले.
श्री क्षेत्र थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक प्रमुख स्थळ असून श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भक्त येथे येतात. हेतल पटेल यांच्या भेटीमुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
Editer sunil thorat




