एस. एम. जोशी कॉलेजच्या एनएसएस स्वयंसेवकांकडून ‘स्वच्छोत्सव’ मोहीम उत्साहात…

हडपसर (पुणे) : दि. ४ ऑक्टोबर २०२५ रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी दत्तक गाव भोंडवेवाडी येथे “स्वच्छोत्सव” मोहीम राबविली.
ही मोहीम भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालयाच्या क्षेत्रीय संचालनालय, पुणे यांच्या सूचनेनुसार “एक दिन, एक घंटा, एक साथ” या देशव्यापी श्रमदान उपक्रमांतर्गत पार पडली.
“स्वच्छता ही सेवा” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी केले. स्वयंसेवकांनी गावातील विविध ठिकाणी स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या आणि श्रमदानाच्या विचारांची जाणीव या मोहिमेद्वारे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली.
या उपक्रमात प्रा. स्वप्निल ढोरे यांनी स्वयंसेवकांसोबत प्रत्यक्ष स्वच्छतेचे कार्य केले. यावेळी सरपंच सारिका भोंडवे, उपसरपंच अमित शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष तुषार भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते राहुल नाना भोंडवे, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अजित जाधव, डॉ. ज्योती किरवे आणि डॉ. सोपान आयनार यांनी केले. एनएसएसचे सर्व सदस्य व स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला.
Editer sunil thorat






