‘फॅन्ड्री : भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन ; महेश मांजरेकर यांच्या हस्ते…

पुणे : समाजातील विषमता, सांस्कृतिक असमानता आणि सिनेमा या माध्यमातील सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकणारे लेखक हनुमंत अजिनाथ लोखंडे यांचे पुस्तक ‘फॅन्ड्री : भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ याचे प्रकाशन समारंभ शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील बाल शिक्षण विद्या मंदिर, MES ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड येथे होणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमात गिरीश कुलकर्णी (अभिनेते, दिग्दर्शक, लेखक व निर्माते) आणि किशोर कदम (कवि व अभिनेते) प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमाला आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे विशेष उपस्थित राहणार आहेत.
या प्रकाशन सोहळ्याचे संयोजक शरद तांदळे आहेत.
लेखक हनुमंत लोखंडे यांनी त्यांच्या या पुस्तकात ‘फॅन्ड्री’ या चित्रपटाचा सामाजिक आणि सांस्कृतिक अंगांनी सखोल अभ्यास करत भारतीय सिनेमातील जातिविषयक संवेदनशीलतेचा चिकित्सक वेध घेतला आहे. या पुस्तकास कवि आणि अभिनेते किशोर कदम यांनी प्रस्तावना लिहिली असून गिरीश कुलकर्णी यांनी ब्लर्ब लिहिले आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने प्राध्यापक, समाजसेवक, संशोधक, अभ्यासक आणि सर्व रसिक वाचकांना सिनेमा आणि समाजातील नातेसंबंधांवर मंथन घडविणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Editer sunil thorat



