
पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील पवित्र श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शिवसेना-युवासेना मांजरी शाखेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत पालेभाज्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सिरम कंपनीसमोर ढेरेबंगला, मांजरी बु. येथे झालेल्या या उपक्रमात तब्बल २१०० पालेभाज्यांचे मोफत वाटप नागरिकांना करण्यात आले.
या उपक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रावण महिन्याचे धार्मिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन अशा उपक्रमांद्वारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील राजेंद्र वसवे (शिवसेना प्रभाग प्रमुख, मांजरी) व किरण प्रताप जाधव (युवासेना सरचिटणीस, हडपसर विधानसभा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य, जनसंपर्क आणि सेवा हाच धर्म हे भान पुन्हा अधोरेखित झाले. नागरिकांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
Editer sunil thorat




