पुण्यात कामगाराकडून हॉटेल मालकाची हत्या…

पुणे (वारजे) : कोंढवे धावडे परिसरातील पीकॉक फॅमिली गार्डन बार अँड लॉजिंग येथे किरकोळ वादातून कामगाराने हॉटेल मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री सुमारे आठ वाजता घडली.
खून झालेल्या हॉटेल मालकाचे नाव संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे असून, आरोपी कामगाराचे नाव उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज) असे आहे. गिरीला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कसे घडले प्रकरण?
गिरी मागील एक महिन्यापासून शेट्टी यांच्या हॉटेलमध्ये काम करत होता. तो अनेकदा दारूच्या नशेत कामावर येत असे आणि काम नीट करत नसे. त्यामुळे शेट्टी त्याला वारंवार समज देत असत. मंगळवारी रात्री पुन्हा किरकोळ वाद झाल्यानंतर गिरीने किचनमधील चाकू उचलून शेट्टी यांच्या मानेवर वार केला. या वारात शेट्टी यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई…श
प्रसंगावधान राखून हॉटेलमधील इतर कामगारांनी गिरीला पकडून ठेवले आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या घटनेमुळे वारजे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Editer sunil thorat



