नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी ५० हजारांची लाच ; रंगेहाथ एसीबीच्या ताब्यात.वाचा सविस्तर…

मालेगाव : नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना एक इसम एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शेख सुलतान शेख अक्रम (वय २८) असे लाचखोराचे नाव असून तो मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड येथे बाऊंसर म्हणून कार्यरत आहे.
तक्रारदाराने आपल्या मालकीच्या सर्व्हे नं. २६०, प्लॉट नं. २२ येथे बांधलेल्या गोडाऊनसाठी नवीन कमर्शियल मीटरसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र, कार्यालयाकडून त्यांना एका वेगळ्या प्लॉटवरील (सर्वे नं. २६०, प्लॉट नं. ३१, देविका मल्ला, बाबा टॉवर) प्रलंबित वीज चोरीचे बिल रुपये १,२६,३२४.९५ व कंपाऊंड बिल रुपये ४०,००० भरल्याशिवाय मीटर मिळणार नाही असे सांगण्यात आले.
तक्रारदाराचा त्या प्लॉटशी काहीही संबंध नसतानाही आरोपी शेख सुलतान यांनी “बिल न भरता काम करून देतो” म्हणून ८० हजारांची मागणी केली. तडजोड करून ५० हजारांत व्यवहार ठरला.
दिनांक २५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने लाचेची रक्कम देताच, एसीबीने सापळा रचून आरोपीस ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर मालेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.
Editer sunil thorat




