जिल्हासामाजिक

कदमवाकवस्तीमध्ये लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत ; ४८ गणेश मंडळांत प्राणप्रतिष्ठापना…

पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (दि. २७ ऑगस्ट) पावसाच्या हलक्या सरींमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे दणदणीत स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘एक, दोन, तीन, चार… गणपतीचा जयजयकार’ अशा गर्जनांनी गावभर दुमदुमून भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशे, गुलाल आणि फुलांच्या उधळणीसह गणेशमूर्तींच्या मिरवणुकीत परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला.

गावातील मुख्य रस्त्यांवर सकाळपासूनच गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. पूजा साहित्य, मखर, सजावटीचे साहित्य यांची विक्री मोठ्या उत्साहात झाली. सजविलेल्या वाहनांतून, डीजेच्या तालावर व ढोल-ताशांच्या गजरात गणेश मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यंदा कदमवाकवस्ती परिसरातील ४८ नोंदणीकृत गणेश मंडळांनी पारंपारिक व धार्मिक विधीने प्राणप्रतिष्ठापना केली. यामध्ये प्रामुख्याने –

सुवर्णयुग मित्र मंडळ, सुवर्णतेज मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, नवयुवक मित्र मंडळ, सावता माळी मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, गणराज मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, नवमहाराष्ट्र मित्र मंडळ, श्री विनायक प्रतिष्ठान, श्री समर्थ सेवा मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, व्यंकटेश मित्र मंडळ, शितळा देवी मित्र मंडळ, अंबिका नवरात्र मित्र मंडळ

तसेच लोणी स्टेशन परिसरातील – श्री गणेश मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, अंबिका माता तरुण मंडळ घोरपडे वस्ती, श्री गणेश तरुण मित्र मंडळ इंदिरानगर घोरपडे, संभाजीनगर, कदमवस्ती व वाकवस्ती येथील मंडळांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली.

लहान-मोठ्या मंडळांसह घरगुती गणपती प्रतिष्ठापनेमुळे संपूर्ण गाव भक्तिभावाने उजळून निघाले. पावसाच्या सरी असूनही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

गावात पुढील दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य देखावे, सामाजिक उपक्रम, महाप्रसाद वितरण व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या प्रारंभीच भक्तिभाव, जल्लोष आणि सांस्कृतिक वातावरणाची चाहूल लागली असून कदमवाकवस्तीमध्ये सणाचे औचित्य अधिकच रंगतदार होणार आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??