
मांजरी (पुणे) : मांजरी केशवनगर साडेसतरा नळी शेवाळेवाडी प्रभागात गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सोसायट्या व मित्रमंडळांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने गणरायाची स्थापना करून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये शेवाळेवाडी येथील रागिणी ड्रीम्स व विस्ता लग्झिरीया या सोसायट्यांमध्ये तसेच साडेसतरानळी येथील मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात विक्रम शेवाळे यांनी सहभागी होत गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेऊन विक्रम शेवाळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात बाप्पाची आरती केली. भक्तिगीतांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, शेवाळेवाडी गावातील शिवशंभो मित्र मंडळ व जय गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमानंतर मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी, गणेशभक्त व नागरिकांनी उपस्थिती लावली. मंडळाच्या सर्व सदस्यांशी संवाद साधत उपस्थित मान्यवरांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
गणरायाच्या दर्शनाबरोबरच धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय व आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.
Editer sunil thorat






