शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन ; कदमवाकवस्ती

कदमवाकवस्ती (पुणे) : शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना पुणे शहर महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी यावेळी विचार खालील प्रमाणे मांडले…
उद्घाटनावेळी बोलताना राम रेपाळे यांनी निलेश काळभोर यांचे कौतुक करताना म्हटले की,
“निलेश माझा लाडका कार्यकर्ता आहे. तो माझ्याशी भांडतो, पण हे भांडण समाजाच्या प्रश्नांसाठी असते. त्यामुळे मी त्याच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे.” ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या “७० टक्के समाजकारण आणि ३० टक्के राजकारण” या विचारसरणीवर शिवसेना उभी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष सामान्यांच्या प्रश्नांना खरी दिशा देत आहे.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
> “संपर्क कार्यालय हे मंदिर आहे आणि येथे येणारे नागरिक हेच दैवत आहेत. त्यांचे प्रश्न सोडवणे हीच खरी सेवा आहे.” नाना भानगिरे यांनी ग्वाही दिली की, निलेश काळभोर भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतील. “सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घ्यावा. पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते प्रवीण काळभोर यांनीही निलेश दादांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की,
“साध्या घरातून आलेले निलेश काळभोर आज जनतेचा आवाज बनले आहेत. त्यांच्या पाठीशी तरुणाई व महिलांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे ते भविष्यात नक्कीच उल्लेखनीय कार्य करतील.”
मान्यवरांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती…
या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. त्यामध्ये देविदास काळभोर (माजी उपसरपंच कदमवाकवस्ती), प्रवीण काळभोर (जिल्हा नियोजन समिती सदस्य पुणे), उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष पुणे जिल्हा प्रमुख युवराज काकडे, अलंकार कांचन (जिल्हा नियोजन समिती सदस्य पुणे), पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर (चेअरमन पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड), मनोज काळभोर (तंटामुक्ती अध्यक्ष लोणी काळभोर), सतीश काळभोर (उपाध्यक्ष हवेली राष्ट्रवादी काँग्रेस), भारत मिसाळ (माजी पंचायत समिती सदस्य), विपुल शितोळे (तालुका प्रमुख शिवसेना हवेली), सागर फरतडे (शहर प्रमुख उरुळी कांचन शिवसेना), पारस वाल्हेकर (उपतालुका प्रमुख हवेली शिवसेना), नंदू पाटील काळभोर (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली), राजश्री काळभोर (माजी उपसरपंच ग्रामपंचायत कदमवाकवस्ती), सुनंदा काळभोर (सदस्य ग्रामपंचायत कदमवाकवस्ती), दिलीप वाल्हेकर (अध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट), रमेश भोसले (उपतालुका प्रमुख हवेली शिवसेना उबाठा), गजानन काळभोर (सामाजिक कार्यकर्ते लोणी काळभोर), सागर राजगुरू (अध्यक्ष छत्रपती सेवा संघ), सचिव निखील काकडे आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे…
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलंकार कांचन यांनी केले, तर सुत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. युवक, महिला भगिनी आणि कदमवाकवस्ती नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा सोहळा उत्साहात पार पडला.
Editer sunil thorat






