क्राईम न्युजजिल्हा

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई ; अट्टल मोबाईल चोरटे अटकेत, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे : रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकामावर काम करणाऱ्या परराज्यातील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असून, दोघांकडून एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

चोरीची घटना…

रांजणगाव एमआयडीसीतील कोरेगाव भागात विजय वाघमारे यांच्या बांधकाम साईटवर काही परराज्यातील कामगार वास्तव्यास होते. शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी कामगारांच्या खोलीत घुसून ४ मोबाईल फोन (किंमत ४० हजार रुपये) चोरले.
चोरीदरम्यान एका कामगाराला जाग आल्याने त्याने आरडाओरड केली आणि आरोपी पळून गेले. तत्काळ कामगारांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची धडक तपास मोहीम…

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी विशेष पथक तयार केले. तपासदरम्यान पोलिसांनी अथर्व राहुल काळे (रा. बाभूळसर खुर्द, ता. शिरूर) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांकडून चोरीस गेलेले मोबाईल जप्त करण्यात आले.

आणखी गुन्हे उघड…

तपास पुढे सरकला असता आरोपींनी शिरूर आणि रांजणगाव परिसरात इतरही अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आणखी ४ मोबाईल (किंमत ६५ हजार रुपये) हस्तगत केले. तसेच रांजणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुलीही आरोपींनी दिली आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी…

या यशस्वी कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, हवालदार राजेश ढगे, नितिन भोस, गणेश वाघ, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर आणि संदिप भांड यांनी विशेष योगदान दिले.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे आणि हवालदार अभिमान कोळेकर करत आहेत

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??