जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

स्वगटातील मानसिक त्रासामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश कांबळे यांचा तडकाफडकी राजीनामा…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश कांबळे यांनी स्वगटातील काहीजण मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करीत उपसरपंच पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली आहे.

पत्रकार परिषदेतच दिला राजीनामा…

ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी नुकतेच ‘सरपंच आपल्या दारी’ या उपक्रमाविषयी माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस. एम. गवारी, सदस्य राजाराम काळभोर, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर आणि माजी सदस्य पांडुरंग केसकर उपस्थित होते.

सरपंचांनी माहिती दिल्यानंतर उपसरपंच गणेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पत्रकार परिषदेतच थेट आपला राजीनामा सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्याकडे सुपूर्त केला.

“गटातील काहीजण मानसिक त्रास देत आहेत”…

पत्रकारांशी संवाद साधताना उपसरपंच गणेश कांबळे म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सरपंच निवडणुकीत आमच्या पॅनलमधील एका सदस्याने सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्या गटाला मतदान केले. त्यामुळे १७ पैकी ९ मते मिळवत ते सरपंच झाले. या घटनेचा राग मनात धरून माझ्या गटातील काहीजण माझ्यावर ठपका ठेवत असून मला सतत मानसिक त्रास दिला जात आहे. मीच सरपंच निवडणुकीत मतदान केल्याचा आरोप माझ्यावर होत आहे.”

५ लाख रुपयांचा गाळा प्रकरणातील वाद…

यावेळी त्यांनी आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की, “ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात येणाऱ्या व्यवसायिक गाळ्यांसाठी मी माझ्या कुटुंबियांचे सोने तारण ठेवून ५ लाख रुपयांची रक्कम जमा केली होती. त्यासाठी आवश्यक शासकीय चलन भरून पीएमआरडीकडे परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, आज अखेर मला ना गाळा मिळाला, ना मी भरलेली रक्कम परत करण्यात आली. या कारणामुळे माझे कुटुंब मानसिक तणावात आहे.”

राजीनाम्यामुळे ग्रामपंचायतीत खळबळ…

उपसरपंच गणेश कांबळे यांनी थेट पत्रकार परिषदेत दिलेला राजीनामा आणि त्यामागील आरोपामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळात ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणांवर या घडामोडीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??