
पुणे : वकिली क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर लेखनकौशल्य, अर्ज व निवेदन तयार करण्याचे तंत्र, तसेच न्यायालयीन सादरीकरणातील आत्मविश्वास यांचा सर्वंकष विकास व्हावा, या उद्देशाने सिंहगड विधी महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. काल दि. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेत “ड्राफ्टिंग, प्लीडिंग, कन्व्हेसींग व ॲडव्होकेसी स्किल” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांची उपस्थिती…
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विपुल दुशिंग, तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ ॲड. राजेंद्र काटोरे उपस्थित होते. याशिवाय ॲड. श्रीकांत पन्हाळे, ॲड. विशाल बकाल आणि ॲड. निखिल कुलकर्णी यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
व्यावहारिक ज्ञानाचा ठेवा…
तज्ज्ञांनी न्यायालयीन कारवाईतील प्रत्यक्ष प्रक्रिया, अर्ज व निवेदन लेखन, कायदेशीर कागदपत्रे तयार करण्याची पद्धत, तसेच प्रभावी वकिली करण्याच्या तंत्रांचा उलगडा करून दिला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना फक्त सैद्धांतिक नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली. त्यामुळे भावी वकिली कारकिर्दीसाठी आवश्यक असलेली व्यावहारिक तयारी विद्यार्थ्यांना लाभली.
विद्यार्थ्यांचा उत्साह…
या कार्यशाळेला राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सत्रांदरम्यान विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांना प्रश्न विचारून शंका निरसन केले. कार्यशाळेच्या शेवटी झालेल्या संवाद सत्रामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला आणि वकिली व्यवसायाकडे अधिक गंभीरतेने पाहण्याची प्रेरणा मिळाली.
आयोजनाचे योगदान…
सिंहगड विधी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या कार्यशाळेला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रा. अमोल शेलार व प्रा. किर्ती कांबळे यांचे सक्रिय सहकार्य कार्यशाळा यशस्वी होण्यात महत्त्वपूर्ण ठरले. याशिवाय विद्यार्थी प्रतिनिधी गौरव पवार व खुशी डोंगरे यांनी कार्यशाळेच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
भावी वकिलांसाठी प्रेरणादायी अनुभव…
कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन वकिली क्षेत्रातील कारकिर्द अधिक सक्षम बनेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Editer sunil thorat



