
हडपसर (पुणे) : रस्त्यावर लहान-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग बांधवांवर अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, त्याऐवजी त्यांना पथारी विभागाचे अधिकृत लायसन्स देऊन गरजूंना स्टॉल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी दत्तात्रेय ननवरे (अध्यक्ष), अभय पाटील व शशिकांत राऊत यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक निरीक्षक अभिलेष कांबळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभं राहून सन्मानाने जीवन जगता यावं, यासाठी शासन व प्रशासनाने सहानुभूती न दाखवता ठोस विश्वास द्यावा, अशी मागणी ट्रस्टतर्फे करण्यात आली.
“सहानुभूती नको, विश्वास दाखवा,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
Editer sunil thorat



