महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्याचे आवाहन. ; ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध होणार पंप…

पुणे : शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान कुसुम-बी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत ३ एचपी, ५ एचपी व ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानावर मिळणार आहेत, अशी माहिती महाऊर्जा पुणे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी दिली.
—खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना पंप क्षमतेनुसार १० टक्के हिस्सा भरावा लागेल.
—अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे.
—हिस्सा भरण्याबाबत पात्र शेतकऱ्यांना थेट एसएमएसद्वारे कळविण्यात येते.
महत्त्वाची माहिती…
आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ८,२०५ सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.
नवीन अर्ज नोंदणीसाठी संकेतस्थळे – https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
https://kusum.mahaurja.com/beneficiary/ र्ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज नोंदणीपासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्ज छाननी, लाभार्थी हिस्सा भरणे व पुरवठादार निवडणे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
सावधानतेचे आवाहन…
लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जा कडून पाठविलेल्या एसएमएसशिवाय इतर खोट्या संदेशांपासून सावध राहावे आणि फसवणुकीपासून बचाव करावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले.
Editer Sunil thorat




