जिल्हाशिक्षणसामाजिक

जल्लोष युवा महोत्सवातील विजयी विद्यार्थ्यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान…

इंदापूर (पुणे) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठविद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ सप्टेंबर रोजी दादा पाटील महाविद्यालय, कर्जत (जि. अहमदनगर) येथे आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले.

वादविवाद स्पर्धेत अक्षय यादवसायली मखरे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. भारतीय वैयक्तिक गायन स्पर्धेत सरदार मुलाणी याने तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक मिळवले, तर ओंकार कदम याने तालवाद्य या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदकाची कमाई केली.

या विजयी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. पुढील काळातही असेच यश मिळवून सर्वांगीण विकास साधावा, यासाठी संस्थेच्यावतीने आम्ही कटिबद्ध आहोत.”

कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, कला विभाग प्रमुख डॉ. भरत भुजबळ, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे, प्रा. प्रकाश करेप्रा. सचिन आरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??