
पुणे : पुणे जिल्ह्यातील नामांकित श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या एमबीए विभागाचे प्रा. डॉ. प्रमोद जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “आयडॉल ऑफ महाराष्ट्र – शिक्षकरत्न पुरस्कार २०२५” ने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक व अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते पुण्यातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे प्रदान करण्यात आला.
गेल्या १५ वर्षांपासून डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण संवाद आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान मिळाला.
सन्मान स्वीकारताना प्रा. डॉ. प्रमोद जाधव म्हणाले –
“या यशामागे देशातील नामांकित श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमचे स्नेही आप्त आदरणीय पुरुषोत्तम जगताप यांचे मार्गदर्शन, श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे, सर्व संचालक व विश्वस्त मंडळ तसेच शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संजय देवकर यांचे मोलाचे योगदान आहे.”
यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी व मुलांचे पाठबळ, तसेच नातेवाईक आणि ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. “गुरुजनांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांची साथ आणि विद्यार्थ्यांचा विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे”, असेही डॉ. जाधव यांनी नमूद केले.
Editer sunil thorat



