२१ सप्टेंबरला सूर्यग्रहण ; गरोदर महिलांनी ‘सूतक’ काळात घ्यावी विशेष काळजी! टाळा या ६ चुका

पुणे : हिंदू धर्म व ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची व दुर्मिळ खगोलीय घटना मानली जाते. या काळात वातावरणात नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो, असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते. जरी ग्रहणाचा परिणाम सर्वांवर होत असतो, तरीही गर्भवती महिलांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या व बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही विशिष्ट नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो.
या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण…
या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी (रविवार) होणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री १०:५९ वाजता सुरू होऊन सकाळी ३:२३ वाजेपर्यंत चालेल. ग्रहणाचा मध्यकाळ १:११ वाजता असेल. एकूण वेळ साधारण ४ तास २४ मिनिटांचा असेल.
सूतक काळाची सुरुवात…
ग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी म्हणजेच सकाळी १०:५९ वाजता सूतक काळ लागू होईल. धार्मिक मान्यतेनुसार या काळात मंदिरे बंद ठेवली जातात, पूजा-अर्चा टाळली जाते, तसेच काही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
गरोदर महिलांनी टाळाव्यात या ६ चुका…ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक परंपरांनुसार, गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण आणि सूतक काळातन खालील गोष्टी टाळाव्यात:
— सूतक व ग्रहणावेळी घराबाहेर जाणे टाळा – नकारात्मक ऊर्जेचा थेट परिणाम होतो, असे मानले जाते.
— स्वयंपाकघरातील काम व शारीरिक श्रम टाळा – शक्य तितकी विश्रांती घ्यावी.
— सूर्यकिरणांचा संपर्क टाळा – ग्रहणाच्या वेळी खिडक्या-दारे बंद ठेवणे उचित मानले जाते.
— नकारात्मक विचार, राग किंवा वाद टाळा – मानसिक स्थिती बाळाच्या भावनिक विकासावर परिणाम करू शकते, अशी धारणा आहे.
— केस आणि नखे कापणे टाळा – हे ग्रहणाच्या आधी किंवा नंतरच करावे.
— अन्न सेवन टाळा – ग्रहणकाळात अन्नपदार्थ अपवित्र मानले जातात. ग्रहण संपल्यानंतरच भोजन करावे.
सकारात्मकता महत्वाची…
ग्रहणाच्या वेळी मनाची अवस्था खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे गर्भवती महिलांनी शक्य तितके सकारात्मक राहावे, धार्मिक मंत्र किंवा स्तोत्र पठण करावे, शांत वातावरणात विश्रांती घ्यावी, असे शास्त्रात सांगितले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोन…
वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास, सूर्यग्रहणामुळे मानवी आरोग्यावर थेट अपाय होत नाही. मात्र, गरोदर महिलांनी या काळात मानसिक तणाव टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी व आहार व्यवस्थित ठेवावा, असे स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात. धार्मिक परंपरेनुसार पाळले जाणारे नियम हा मानसिक शांतीचा भाग आहे, असेही डॉक्टरांचे मत आहे.
त्यामुळे २१ सप्टेंबरला होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी धार्मिक परंपरेचा मान राखत तसेच वैद्यकीय दृष्टिकोन लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
टिप – या बातमीची ‘द पाॅईंन्ट न्युज’24 पुष्टी करत नाही
Editer sunil thorat



