जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बिरोबाची खोटी शपथ घेतो…; बापू बिरु वाटेगावकर यांच्या मुलाचा संताप ; पडळकरांवर घणाघात…

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून, सत्ताधाऱ्यांनाही या प्रकरणात पडळकरांना समज द्यावी लागली आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं…

काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचा अवमान करणारे वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आणि राज्यभरात पडळकरांविरोधात आंदोलन सुरू झालं. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीदेखील पडळकरांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

“पडळकरांना समाजात किंमत नाही” ; वाटेगावकरांचा इशारा

वाद चिघळत असताना वाळवा तालुक्यातील बापू बिरु वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट इशारा दिला आहे.
त्यांनी संताप व्यक्त करत सांगितलं –
“गोपीचंद पडळकरांना समाजात काडीचीही किंमत नाही. जे आमच्या कुलदैवत बिरोबाच्या देवळात जाऊन खोटी शपथ घेतात की मी जरी उभा राहिलो तरी भाजपला मतदान करू नका, अशा माणसाने जयंत पाटील यांच्याविषयी बोलणं लाजिरवाणं आहे. जयंत पाटील तुम्हाला आतलू-फालतू माणूस वाटतात का? नाही! त्या माणसाच्या नादाला लागू नका. जर तुम्ही वाळवा तालुक्यात आलात, तर कपडे काढून वापस पाठवू,” असा कठोर इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप…

वाद पेटल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागला.
याबाबत पडळकर यांनी स्वतः माहिती देताना सांगितलं –
“मुख्यमंत्र्यांनी मला काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचनांचं मी पालन करणार आहे,” असं पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादीचं आक्रमक आंदोलन…

या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी पडळकरांचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. जयंत पाटील यांच्या समर्थकांनी पडळकरांविरोधात रास्ता रोको, निषेध मोर्चे आणि प्रतिकात्मक आंदोलन केलं.

पडळकरांचे वादग्रस्त प्रवास…

गोपीचंद पडळकर हे वारंवार वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले आमदार आहेत. याआधीही त्यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानांमुळे मोठा गदारोळ झाला होता. आता जयंत पाटील यांच्याबाबतचे विधान त्यांच्या राजकीय कारकिर्दीत नवी अडचण निर्माण करत असल्याचं दिसत आहे.

जयंत पाटील गटाचा पलटवार…

या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. “जयंत पाटील हे आमचे नेते आहेत, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी स्पष्ट केलं आहे की, पडळकरांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??