जिल्हा
यवत हद्दीतील लाॅज बनले वेश्या व्यवसायाचे केंद्र बिंदू, पोलीसांची हाताची घडी तोंडावर बोट.?

पुणे (दौंड) : यवत हे मोठे प्रगतशील शेतकरी यांचे गाव म्हणून परिसरात ओळखले जाते. तसेच या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळाचा मुक्काम असतो.
यवत हे गाव कायमच कोही कारणाने चर्चेत राहिलेले गाव असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या गावामध्ये यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे सोलापूर महामार्गा लगत असणाऱ्या सी एन जी पंप जवळ असणाऱ्या धनश्री हाॅटेल अॅड लाॅज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खुले आम देह विक्री व्यवसाय जोमात चालू असल्याचे आढळून आले आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी 112 हेल्पलाईन वर व स्थानिक पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी करून ही पोलीस प्रशासनाची “हाताची घडी तोंडावर बोट” असी भुमिका पाहायला मिळत आहे. तरी या अवैध देह विक्री करणार्या लाॅज धारकांना स्थानिक पोलीस ठाण्यातून मूक परवानगी दिल्याची नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. तरी यावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.



