त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर हल्ल्याचा हवेली तालुका मराठी पत्रकार संघाचा जाहिर निषेध…

लोणी काळभोर, (ता.२२) : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा हवेली तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
हे निवेदन पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना देण्यात आले असून गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांनी स्वीकारले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, हवालदार मंगेश नानापुरे उपस्थित होते. गावगुंडांनी केलेल्या या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघाकडून करण्यात आली.
पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून, ते अन्यायग्रस्त व पीडितांचे प्रश्न पुढे आणतात. अशा पत्रकारांवर होणारी मारहाण ही गंभीर बाब असल्याचे मत संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे यांनी व्यक्त केले.
राज्य सरचिटणीस सिताराम लांडगे यांनी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच “पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ लागू करावा, अन्यथा भविष्यात पत्रकार संघाकडून तिव्र स्वरुपाचे राज्यभर आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
या वेळी जेष्ठ पत्रकार शरद पुजारी, तालुका कार्याध्यक्ष तुषार काळभोर, सचिव विजय रणदिवे, उपाध्यक्ष गणेश धुमाळ, संघटक दिगंबर जोगदंड, प्रसिद्धी प्रमुख दीपक गिरी, सरचिटणीस ज्ञानेश्वर शिंदे, कार्यकारिणी सदस्य अमन शेख, सहदेव खंडागळे, सुवर्णा कांचन, तुषार खोले आदी उपस्थित होते.
Editer Sunil thorat




