भाजप आमदार पडळकर यांच्या घाणेरड्या वक्तव्याचा निषेध ; सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा’, विराट सभा…

सांगली : ज्यांचे सामाजिक कार्य हे उत्तुंग व निष्ठावान आहे असे स्व. राजारामबापू पाटील व त्यांच्या कार्यामध्ये कायम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या घाणेरड्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्यावतीने आज सांगली येथे ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा’ काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्त्व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. यावेळी भाजप नेत्यांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीला कसं कलंकित केलं जातं आणि राजकीय संस्कृती कशी मलीन केली जाते, यावर भाष्य करण्यात आले. वाचाळ आणि मोकाट सुटलेल्या नेत्यांना भाजपाने वेळीच आवर घालावा, अन्यथा भाजपाने पोसलेली ही विकृती भविष्यात भाजपावरच उलटणार, असा इशाराही या मोर्चातून देण्यात आला.
मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते जयंत पाटील, ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार रोहीत पवार, आमदार अरुण लाड, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Editer Sunil thorat





