
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : समतानगर येथील नवदुर्गा महिला मंडळाचा नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापना करण्यात आली. मंडळाची स्थापना २०२२ मध्ये झाली असून यावर्षी उत्सवाचे चौथे वर्ष आहे. मातीची तीन फूट उंचीची देखणी देवीची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
नवरात्रात दांडिया, भजन, कीर्तन, लोककला यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप, पिण्याचे पाणी, स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांच्या सुरक्षेसाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
अध्यक्ष रेखा पांडुरंग कामठे, उपाध्यक्ष स्वाती चंदनशिवे, सदस्य झिनत शेख, गीता करंजकर, सुनंदा सोनवणे, स्वाती डोळसे यांच्यासह कार्यकर्ते मंडळाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. समाजात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण मंडळाने पुढे ठेवले आहे.
विसर्जन ७ ऑक्टोबर रोजी होणार असून मिरवणूक समतानगर येथून लोणी स्टेशनमार्गे विसर्जन घाटावर नेण्यात येईल.
Editer sunil thorat



