जिल्हासामाजिक

लासुर्णे येथे शालेय दप्तर व साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात…

संपादक डॉ गजानन टिंगरे 

लासुर्णे (इंदापूर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहनपर उपक्रम म्हणून एकता सामाजिक फाउंडेशन, लासुर्णे व स्व. शंकरराव नारायण पाटील बहुउद्देशीय संस्था, मदनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, लासुर्णे येथे बुधवारी (दि. 24 सप्टेंबर 2025) शालेय दप्तर व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

“ज्ञानदानापेक्षा मोठे दान नाही” या विचारातून उपक्रम…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने व “ज्ञानदानापेक्षा मोठे दान नाही” या मूल्यपूर्ण विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पेनसह इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

सरपंच रुद्र सेन भैया पाटील यांची घोषणा…

या कार्यक्रमास लासुर्णे ग्रामपंचायत सरपंच रुद्र सेन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप उपक्रमाचे कौतुक केले. तसेच १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्त विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

मान्यवरांची उपस्थिती…

कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच बाबासाहेब जाचक, सदस्य संतोष लोंढे, अमित चव्हाण, निखिल भोसले, सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांवर भर…

एकता सामाजिक फाउंडेशनचे सदस्य किरण चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. तर स्व. शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

आयोजकांचे नियोजन कौतुकास्पद…

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकता सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सुतार, सचिव राजश्री सुतार, सदस्य गणेश लोहार आदींनी नियोजन करून परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीमुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत…

कार्यक्रमादरम्यान शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य झळकत होते. शैक्षणिक ओढ वाढवणारा आणि स्मरणात राहील असा हा उपक्रम असल्याचे पालक व उपस्थितांनी नमूद केले. शेवटी आयोजकांनी या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्व शिक्षकवर्ग व मान्यवरांचे आभार मानले.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??